बाज | मधील मोटारसायकल चोरटा साथीदारसह जेरबंद,6 मोटारसायकली जप्त : जत पोलीसाच्या पथकांची कामगिरी |

0
5

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मोटारसाकली चोरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीतील एकास बाज,(ता.जत)येथे छापा टाकत उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जेरबंद केले.आदिक उर्फ समाधान ऐवळे,(रा. बाज) व त्यांचा साथीदार  समाधान आप्पा शितोळे रा.जांभूळवाडी ता.कवटेमहांळ असे संशयित चोरट्यांचे नाव आहे.जत बस स्टँडवसमोरून सोमवारी एक मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार जत पोलीसांत दाखल झाली होती.मोटारसायकल चोरीच्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सुरू केला.  

चोरट्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने जत तालुक्यातील बाज गावी सापळा रचला.त्यावेळी आदिक उर्फ समाधान ऐवळे हा चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी अंकले रस्ता चाैकात थांबला असता,पोलीस पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.त्याची कसून चाैकशी केली व त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीच्या सहा मोटारसायकली सापडल्या.त्या पोलीसांनी ताब्यात घेत चोरट्याला अटक केली.

चोरट्याकडे हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर -एमएच 10,क्यू 1भारती,रोहोंडा-एमएच 01- 2257,हिरोहोंडा-एमएच 10,एई 8117,  हिरोहोंडा – एमएच 45,जी 1190, बजाज कंपनीची-एमएच 08,जे 7981 व हिरोहोंडा कंपनीची- विना नंबर प्लेटची एक,अशा 6 मोटारसायकली सापडल्या. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन गढवे,पोलिस विजय अकुल,दादासाहेब ठोंबरे,सुनिल व्हनखंडे,तोहिद मुल्ला यांनी सहभाग घेतला.  अधिक तपास संदीप साळुंखे करित आहेत.

बाज ता.जत येथील मोटारसायकल चोरट्यांसह डिवायएसपी अनिकेत भारती,सा.पोलीस निरिक्षक सचिन गढवे व पथक 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here