जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात चारा छावणी करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.छावण्या चालू करण्यासाठीचे शासनाचे अध्यादेश अनेक संस्थाकडून ऑनलाइन काढण्यात आले आहेत.त्यामुळे जत तालुक्यात चारा छावण्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अनेक संस्था कडून छावण्या सुरु करण्यासाठी प्रयत्न चालवला आहे.मात्र शासनाच्या किचकट अटीमुळे तालुक्यात कमी प्रमाणात छावण्या सुरू होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जत तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून पावसाने दगा दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.यंदा तर परिस्थिती भयानक झाली आहे.जनावरांची उपासमार सुरू आहे. पाणीटंचाई व जनावरांचा चारा हा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे तातडीने चारा छावण्या करण्याची मागणी अनेक पक्ष,संघटनांनी अंदोलने करत करण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. शासनाचा नवे अध्यादेश अनेक संस्थांनी काढले आहेत. त्यातील नियम,अटी बघून अनेक संस्थाचालक काढण्याच्या स्पर्धेतून मागे पडलेत. त्यामुळे नेमक्या किती छावण्या चालू होतील यावर प्रश्नचिन्ह आहे.छावणीसाठी फक्त पाचशे जनावराची मर्यादा असल्याने एकापेक्षा अनेक छावण्या सुरू करता येणार आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची सोय होणार आहे.





