डफळापूर,वार्ताहर : चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर कँनॉलचे काम पुर्ण झालेल्या डफळापूर येथील तलावात म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आल्याने तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ऐन उन्हाळ्यात तलावाचे पात्र 50 टक्के भरले आहे.गेल्या दोन महिन्यापासून कोरडे पडेलेले पात्र पाण्याने भरल्याने तलावेचे रुपडे पालटले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला होणार आहे.त्याशिवाय गाव भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे विहीर तलावाच्या लाभ क्षेत्रात आहे. त्यामुळे पुढील दोन महिने ग्रामस्थांना व्यवस्थित पाणी मिळणार आहे.गेल्या आठदिवसापासून म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून या तलावात पाणी सोडण्यात येत आहे.सोडलेले पाणी कमी-जास्त प्रमाणात येत असल्याने अपेक्षित पाणी तलावात आले नाही.तलाव पुर्ण भरून देण्यासाठीची पाणीपट्टी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी भरली आहे.त्यामुळे पुर्ण तलाव भरून द्यावा अशी मागणी आहे.तलाव पुर्ण
भरल्यानंतर तलावा खालील ओढ्यातून डफळापूरचा काही भाग व कुडणूर,शिंगणापूर पर्यत पाणी नेहण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टीही भरली आहे.ओढापात्रातील बंधारे यातून भरण्यात येणार आहेत.
पाणी सोडल्यामुळे कोरडा पडलेले तलावाचे विस्तीर्ण पात्र असे भरले आहे.