जाड्डरबोबलाद येथील शाळकरी विद्यार्थ्यास मारहाण प्रकरणाने हंगामा

0
2

भाजपचे आ.जगताप,सभापती रवीपाटील गट आमनेसामने : गाव दहशतीखाली
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जाड्डरबोबलाद येथील शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणनाने राजकीय वळण घेतले आहे.भाजपा आमदार विलासराव जगताप व सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांच्या समर्थकांनी एकमेकावर आरोप केले आहेत.तर याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गटाकडून उमदी पोलीसात शक्तीप्रदर्शन गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसावर दबाब टाकला आहे.दोन्ही गटाचे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान दोन्ही गटाच्या वादामुळे गावात तणाव असून नागरिक दहशतीखाली आहेत.
 लिंगायत 12 वीच्या धरेप्पा गुरनिंगप्पा मुंचडी या विद्यार्थ्यांने सभापती रवीपाटील विरोधात बोलले म्हणून त्यांच्या गजानन शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी मारहाण करत अपमान करत शिवीगाळी केली.त्यामुळे त्याला धक्का बसला.अपमानाच्या त्राग्याने त्यांने आत्महत्या करू असा चिठ्ठी लिहून घरातून गायब झाला आहे. राजकारणात विरोध करतोय म्हणून विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्याचा आरोप आमदार जगताप गटाकडून करण्यात आला आहे. खुद्द आ.जगताप उमदी पोहचत पोलीस ठाण्यात धरणे धऱत रवीपाटील वर कारवाईची मागणी केली आहे.
तर रवीपाटील गटाकडून धरेप्पा मुचंडी यांने,मुख्याध्यापक व शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण केली केली,अर्वाच्च भाषा वापरल्याने शिक्षकांनी फक्त समजावून सांगण़्याच्या प्रयत्न केला.त्याला गंभीर मारहाण करण्याचा कोणताही प्रश्न नाही.फक्त रवीपाटील यांनी आ.जगताप यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आमदार सह समर्थकांनी रवीपाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.पोलीसांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here