जत,प्रतिनिधी:करेवाडी,(कोतेबोबलाद)ता.जत येथील बिळानसिध्द आमोगसिध्द शेंडगे यांनी गुरुवारी रात्री एका महिलेच्या घरात कोणीही नसलेच्या फायदा घेत महिलेस मारहाण,विनयभंग केला.हे कोणास सांगितले तर जिवंत ठेवणार नाही,अशी धमकी दिली.याबाबत पडित महिलेने उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.याबाबतचा उमदी
पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.अधिक तपास पोलिस नाईक खरात करीत आहे.