जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील प्रचंड दुष्काळी जनतेला प्रशासनाने गंभीर होत आधार देणे गरजेचे आहे.शासनाने दुष्काळ जाहीर करून पिण्यासाठी पाणी,जनावरांचा चारा,मजुरांना काम आदी सुविधा सुरू केलेल्या नाहीत.त्या तातडीने सुरू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करूनही अद्याप अपेक्षित सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. शैक्षणिक फीचे पैसे परत आलेले नाहीत. चारा छावण्याबाबत अद्याप हालचाली नाहीत. नेमके चारा छावणी चालू करण्याची की याबाबत निश्चित धोरण नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे.टंचाईतील गावांना मागणी असेल तेथे टँकर द्यावा. मानसी वीस लिटर प्रमाणे टँकरच्या टकरचे पाणी वाटत असावे.शासकीय कार्यालयात सध्या सर्वच कामासाठी एजंटांचा सुळसुळाट सुरू आहे.त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावर गंभीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी दिला आहे.
जत तालुक्यातील दुष्काळी सुविधा द्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देताना राष्ट्रवादी नेते सुरेश शिंदे,युवक अध्यक्ष उत्तम चव्हाण,सचिन मदने,पवन कोळी व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





