डफळापूर | दत्त पतसंस्थेने जिल्हाभर विस्तार वाढवावा : खा.संजयकाका पाटील |

0
14

डफळापूर, वार्ताहर :  दत्त सारख्या पतसंस्था ह्या छोटे व्यापारी,उद्योजकांचा आधार आहेत.त्यामुळे त्या सक्षम उभ्या राहिल्या पाहिजेत,त्यासाठी दत्त पतसंस्थेस माझी कायम मदत राहील अशी ग्वाही खा.संजयकाका पाटील यांनी दिली.रवीवारी डफळापूर येथे म्हैसाळ योजनेच्या पाणीपुजनासाठी आलेले खा.पाटील यांनी तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या दत्त पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.यावेळी चेअरमन बाबासाहेब माळी यांनी खा.पाटील यांचा सत्कार केला.माजी सभापती प्रकाश जमदाडे,बाजार संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,सवदे बंन्धू उद्योग समुहाचे संचालक अशोक सवदे,सिध्दीविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजित भोसले,वरदविनायक पतसंस्थेचे चेअरमन सचिन माळी,युवा नेते भारत गायकवाड, शंकर वगरे,चंद्रकात वठारे,किशोर पाटील, संचालक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.पंतसस्थेच्या प्रगतीचे खा.पाटील यांनी कौतुक केले.दुष्काळी भागात अशा संस्था जनतेला आर्थिक हातभार लावण्याचे काम करतात.दत्तने मोठी प्रगती करावी,जिल्हाभर विस्तार करावा,माझी कायम त्यांना मदत राहील असेही खा.पाटील यांनी यावेळी सांगितले.

डफळापूर येथील दत्त पतसंस्थेत खासंजयकाका पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन बाबासाहेब माळी, बाजूस माजी सभापती प्रकाश जमदाडे,अभिजित चव्हाण, दिग्विजय चव्हाण,अशोक सवदे आदी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here