जतेत मागेल तेथे टँकर द्या : कॉग्रेसची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
4

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आहे.पाण्याविना गावे विस्तापित होण्याची वेळ आली आहे. तालुका प्रशासन कागदी घोडे नाचवत आम्हाला अधिकार नाहीत.म्हणून सांगत आहे.त्यामुळे आपण स्व:ता लक्ष घालून जत तालुक्यातील मागणी असलेल्या गावांना टँकर द्यावेत अशा मागणीचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना देण्यात आले.तालुक्यातील पाणी असलेल्या गावांना तातडीने टँकर द्यावेत,चारा छावण्या सुरू कराव्यात अशा मागणी या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी माजी  केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील,जिल्हा बँक संचालक,तथा कॉंग्रेस नेते विक्रम सांवत,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडक,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, प.स.सदस्य दिग्विजय चव्हाण, जत पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी,कॉग्रेसचे सरचिटणीस महादेव सांळुखे,काका शिंदे,आण्णासाहेब गायकवाड,सुरेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जत : जतमध्ये तातडीने दुष्काळी सुविधा द्याव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देताना माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, विक्रम सांवत आदी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here