डफळापूर, वार्ताहर : दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या जत तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. डफळापूरकरांचं हक्काचं पाणी या योजनेच्या कालव्यातून दाखल झाले आहे. महत्त्वकांक्षी सिंचन योजनेंतर्गत जतच्या पश्चिमेकडील अंकले,बाज,बेंळूखी,डफळापूर या गावांना पाणी आले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या विरोधाने रखडलेले कँनॉलचे काम पुर्ण झाले,शनीवारी बिंळूर कालव्यातून डफळापूरात पाणी दाखल झाले असून,आलेल्या पाण्याचे अप्रुप पाहण्यासाठी लोक कँनॉलवर येऊ लागले आहेत.या पाण्याने ओढ्याला खळाळून तलाव भरणार आहे.तलावाखाली डफळापूर गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिर आहे. त्यामुळे गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. तसेच तलावाखालील ओढापात्रातील बंधाऱ्यातही पाणीसाठा होण्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्याने काही प्रमाणात शेती पाण्याचाही प्रश्न संपुष्टात येणार आहे.बिंळूर कालव्यातून डफळापूर तलावात दाखल झालेल्या या कृष्णामाईचे आज सकाळी दहा वाजता येथील यलम्मादेवी मंदिरानजिकच्या ओढापात्रात ओटीभरण व पाणीपुजन सोहळा खा.संजयकाका पाटील,आ.विलासराव जगताप व गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,व ग्रामस्थाच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.





