उमदी | अवैध वाळू तस्करीला तुटपुज्यां कारवाईने बंळ | ; प्रशासनातील काहीच्या अर्थपुर्ण सहयोग कारणीभूत |

0
15

  पोलीस,महसूलची कारवाईला बगल का ?  

उमदी,वार्ताहर :जत तालुक्यातील पश्चिम तलाव,ओढापात्रे व पुर्व भागातील बोर नदीतील अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे या परिसरातील अनेक लोक पूर्वी साधा दुचाकी गाडी वरून फिरणारा आता वातानुकूलीत चार चाकी गाडीतून फिरताना दिसत आहे.कमी कष्टात कमी भांडवलात जास्त पैसै मिळवून देणाऱ्या या काळ्या सोन्याला मागणी जास्त वाढत आहे.यातून मिळणाऱ्या अमाप पैशातुन गुंडा गर्दी वाढत आहे.त्यामुळे ते शेतकरी,शासकीय अधिकारी यांच्यावर देखील हात उचण्यास मागे पुढे बघत नाही.त्यापुढे जात वाळू काढणाऱ्या ओड्या शेजारील शेतकरी विरोध केल्यास त्यांना धमकाविणे,मारहाण करण्यापर्यत वाळू तस्कराचे मजल गेली आहे.वाळू तस्करी करणारी वाहने पकडून अनेक वेळा ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जातात. पण हे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यातून लवकर बाहेर काढण्यासाठी महसूल प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी या वाळू तस्कराचे टँक्टर बाहेर काढून देण्यासाठी इमानइतबारे काम करत आहेत. त्यात त्याच्या अर्थपुर्ण सहयोग ठरलेला असतोच. अवैध वाळू तस्करी सुरु असल्याची माहिती गौण खनिज तस्करी विरोधी पथकाला मिळाल्यावर ते या ठिकाणी पोहचायच्या आधीच या वाळू माफियांना टीप मिळत असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. याचा पुरेपूर फायदा हे वाळू माफियां उचलत आहेत. अनेक वेळा गौण खनिज तस्करी विरोधी पथकातील अधिकारी छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्या सोबत पोलीस बंदोबस्त नसल्याने या पथकावर देखील हल्ले झाले आहेत.यातील थोड्याच आरोपींवर कारवाई झाली आहे.अशा नाजूक कारवाई मुळे यातील वाळू तस्कर
सुसाट आहेत.वाळू माफियांवर दंडात्मक कायद्या अन्वय कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करून मटका बहाद्दरा प्रमाणे यांची देखील तडिपारची कारवाई करावी अशी मागणी जोर घरत आहे.

पोलीस,संख अप्परची कारवाईला बगल
जत तालुक्यात जत येथे विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जत,उमदी येथे पोलीस ठाणे असा मोठा लवाजमा असूनही त्यांना अधिकारी असतानाही गेल्या काही वर्षात एक ही वाळूचे वाहन पकडले नाही हे विशेष.वेगळी रसद पोहचत असल्याने त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत.दुसरीकडे संखला स्वंतत्र अप्पर तहसील कार्यालय असूनही वाळू तस्करी बेफाम सुरू आहे. दररोज सुमारे 50 वर वाहने वाळू तस्करी करत असल्याची कळतयं,त्यावर संख अप्पर तहसीलची कारवाई संशास्पद आहे.कार्यालयाचा वाळूचा कार्यभार एक तलाठी चालवत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे कारवाई सोयीनुसार सुरू आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here