स्व:ताची पापे झाकण्यासाठी विक्रम सांवत यांचे आमदारांवर आरोप ; सुनिल पवार

0
7

जत तालुक्याच्या विकासात कोणतेही योगदान ते सांगावे

 

जत,प्रतिनिधी : कधीही जनतेच्या हितासाठी अंदोलन,उपोषण न केलेल्या विक्रम सांवत यांनी आ.विलासराव जगताप यांच्यावर आरोप करून आपली पापे झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.असा आरोप प्रसिध्दीप्रकाद्वारे माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पवार यांनी केला.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे,जि.प.सदस्य सरदार पाटील,विजय ताड,उमेश सांवत आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, भ्रष्टाचाराने माखलेल्या विक्रम सावंत हे केवळ पत्रकबाजी व वाचाळ बडबड करत आहेत.सांवत यांचे आदर्श घोटाळा,बाजार समिती मधील जमीन व गाळ्यामधील गैरव्यवहार, नोकर भरतीतील आर्थिक घोटाळा, तुबची-बबलेश्वरचे गाजर हे सर्व तालुक्यातील जनतेला माहित आहेत. विक्रम सावंत यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहून व जिल्हा परिषदेच्या सभेस जनतेच्या समस्यांवर आवाज उठविला नाही ही वस्तुस्थिती आहे. 

पवार म्हणाले,जत तालुक्यातील जनतेचा कळवळा आहे,म्हणणाऱ्या विक्रम सावंत यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. बाजार समितीवर निवडून आल्यापासून केवळ भ्रष्टाचार करण्यावरच त्यांचा जोर आहे.उमदी येथील जमीन कमी किमतीत घेऊन बाजार समितीला जादा दरात देण्याचा घाट 

त्यांनी घातला आहे. याबाबत स्व:ता आमदार विलासराव जगताप यांनी आवाज उठवून हा डाव हाणून पाडला.बाजार समितीत नोकर भरती लाखो रुपयांची देवाण घेवाण करून झाली.जत जनावर बाजार आवारातील व्यापारी गाळ्यांचे लिलाव न करता मर्जीतल्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून वाटप करून बाजार समितीचे लाखो रुपयाचे उत्पन्न बुडवण्याचा डाव केला. शहरातील बाजार समितीच्या शिवाजी महाराज व्यापारी संकुल चांगल्या स्थितीत असताना ते पाडून पायऱ्या बांधल्या हे काम आपल्या खास मर्जीतील माणसाकडून करून घेऊन यामध्ये भ्रष्टाचार केला.त्यांच्या ताब्यातील बाजार समिती आवार हा दारूचा व जुगाराचा अड्डा बनला आहे. बाजार समितीचे कार्यालय विक्रम सावंतच्या कार्यकर्त्यांनी बार बनविला आहे,असाही आरोप पवार यांनी केला.यापूर्वी विक्रम सावंत यांनी अनेक घोटाळे केले आहेत.आदर्श घोटाळ्यामध्ये वडिलांच्या नावे कोट्यावधी रुपयांचा फ्लॅट तसेच स्वता:च्या व कुटूबियांच्या नावे अनेक जागा खरेदी केल्या, हे व्यवहार करण्यासाठी भ्रष्टाचाराचाच पैसा वापरला. लवंगा येथे साखर कारखाना काढण्याचे खोटे सांगून स्वता:च जमिनी बळकावल्या. डफळापूर मध्ये साखर कारखाना काढतो म्हणून जनतेला फसविले.गेली 10 वर्ष विक्रम सावंत पूर्व भागातील लोकांना तुबची- बबलेश्वरचे गाजर दाखवीत आहेत. कर्नाटकातील व महाराष्ट्रातील मंत्र्यांना भेटून पाणी देण्याचे नाटक सुरु आहे. आठ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 कोटी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता असे पर्यंत तो निधी मिळाला नाही. कर्नाटकाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांनी संयुक्तरित्या करार करून तुबची- बबलेश्वर योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु माजी मंत्री स्व.पतंगराव कदम व आघाडी शासनाने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याचवेळेस आघाडी शासनाने संयुक्त योजना राबविली असतीतर पूर्व भागाला आतापर्यत पाणी मिळाले असते. परंतु त्यावेळी त्यांनी झोपा काढल़्या. विक्रम सावंतानी तालुक्यासाठी आजवर कोणताही मोर्चा, उपोषण, आंदोलन केले  नाही. कोणत्याही आढावा बैठकीत उपस्थित राहून तालुक्याच्या समस्या मांडल्या नाहीत.परंतु आमदार विलासराव जगताप यांनी आश्वासने न देता विकास कामे करून दाखविली आहेत. म्हैसाळ योजनेची कामे, राष्ट्रीय महामार्गाची कामे, इतर सुरु असलेल्या विकासाकामामुळे आमदार विलासराव जगताप यांच्यावर आरोप करण्याचा कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे विक्रम सावंत यांचे तालुक्यातील विकास कामामुळे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. म्हणून प्रसिद्धी पत्रके देऊन व वाचाळ बडबड करून आमदारांची बदनामी करीत आहेत.जिल्हा परिषद सदस्य पदाचा 2 वर्षाचा कालावधीत विक्रम सावंत यांना साधी पिठाची चक्की सुद्धा मंजूर करता आली नाही.गेल्या 2 वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विक्रम सावंतानी एक तरी काम केलेले दाखवावे असे थेट आवाहन पवार यांनी केले.  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here