कवठेमहांकाळ ;पेठवडगाव ता.हातकणंगले जि. कोल्हापूर येथे झालेल्या 8 व्या राज्यस्तरीय “पेंचयाक सिलेट” स्पर्धेत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे खेळाडू आयुष सुधाकर बंडगर यांने 10-11 वर्षाखालील वयोगटात 42 ते 44 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले.त्याची औरंगाबाद येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.त्याचबरोबर वेदांत वैभव पाटील याने 33 ते 36 किलो वजन गटात व वैभव विजय पवार यांने 30 किलो वजन गटात कांस्यपदके मिळवली तर विराज वैभव पाटील व प्रज्वल मसाले यांनी उत्कृष्ट खेळ करत आपले कौशल्य दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले.
मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक आप्पासो तांबे व किरण कचरे यांचे मार्गदर्शन लाभले,तर संस्थापक मोहन माळी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव किशोर येवले,भारत कोटकर, प्राचार्य सौ.कविता मेहरा, सचिन कदम यांचे प्रोत्साहन मिळाले.पेंचक सिलट (penchak silat)हा खेळ साऊथ एशियन गेम आहे.2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून या खेळाचा समावेश होणार आहे. या खेळास भारतीय ऑलिम्पिक संघटना,(भारत सरकार), क्रीडा व युवक मंत्रालय यांची मान्यता आहे. पुढील वर्षांपासून शालेय स्तरावरील खेळात समावेश करण्यात येणार आहे.
मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंना कराटे स्पर्धेत 1 सुवर्ण,2 कास्य पदकाची कमाई करत स्कूलचे नाव उज्वल केले.