जत,प्रतिनिधी : देवनाळ ता.जत येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून 45 हाजार रुपये किंमतीचा संगणक संच व दोन एलईडी टिव्हीची चोरी झाली.याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक कृष्णा तेवरे यांनी जत पोलीसात दिली.मंगळवारी सक्रांती निमित्त शाळेस सुट्टी होती.बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेच्या खोल्या उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. ऑफिस व काही वर्गाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने संगणक संच व एलईडी टिव्ही लंपास केल्या आहेत.





