जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पुर्व भागातील सिंचन योजनेपासून वंचित 42 गावांना कर्नाटकातून पाणी देण्यासंदर्भात राज्यपाल डॉ.विद्यासागर राव यांच्यासमवेत जिल्हा व जत तालुक्यातील नेत्याची बैठक झाली.बैठकीला महावितरणच्या संचालिका निता केळकर,जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख,सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,जेष्ठ भाजप नेते अँड.श्रीपाद अष्टेकर आदी उपस्थित होते. आतररांज्यीय असणाऱ्या तुबची-बबलेश्वर योजनेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात करार करून वंचित गावांना कर्नाटकातून पाणी द्यावे अशी मागणी यावेळी शिष्टमंडळांनी राज्यपाल महोदयांना केली.योजनेच्या सर्व बाबीची माहितीही त्यांना जेष्ठ भाजप नेते अँड.श्रीपाद अष्टेकर व सभापती तम्माणगोंडा रविपाटील यांनी दिली.त्यामुळे या योजनेच्या कामाला गती येणार आहे.
जत पुर्व भागातील सिंचन योजनेपासून वचिंत गावांना पाणी देण्यासंदर्भातील राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांना माहिती देताना अँड.श्रीपाद अष्टेकर,तम्माणगोंडा रवीपाटील आदी





