देवनाळ | येथे पाणी टंचाईचा पहिला बळी | शेततलावून पाणी काढताना शाळकरी मुलीचा पाय घसरून बुडाल्याने मुत्यू |

0
1

जत,प्रतिनिधी : देवनाळ(ता.जत)येथील पाणी टंचाईने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला.शेततळ्यातून पाणी आणणाऱ्या गीता महादेव वाघमोडे (वय-18)हिचा पाय घसरून बुडाल्याने मुत्यू झाला.याबाबतची आकस्मिक मुत्यूचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, देवनाळ येथे तीव्र पाणीटंचाई आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भंटकती करावी लागत आहेत.वाघमोडे कुटूंबीय देवनाळ गावात  राहतात.गिताला रविवारी शाळेला सुट्टी होती.आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.घरात काहीच पाणी नसल्याने गिता ही घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विक्रम शिंदे यांच्या शेततळ्यातील पाणी आणावयास गेली.दरम्यान पाणी भरत असताना शेततळ्यातील प्लाॅस्टिक कागदावरुन गिताचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडली.आजूबाजूला कोणी नसल्याने गिताचा आवाज कुणाला आला नाही.बराचवेळ गीता घरी न आल्याने छोटा भाऊ नामदेव यांने शेततलावात बघितले असता, हा प्रकार समोर आला.त्याने आरडाओरडा केल्याने आजबाजूचे लोक जमा झाले.ग्रामस्थांनी गीताला पाण्याबाहेर काढले.तातडीने उपचारार्थ जत ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले.मात्र तत्पर्वी गिताचा मुत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले. वडील महादेव वाघमोडे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली.तपास पोलिस नाईक सचिन हाक्के करीत आहे.दरम्यान तीव्र पाणी टंचाई असतानाही मुर्दाड प्रशासन टँकर देण्यास टाळाटाळ करत आहे.देवनाळ येथे टँकर सुरू असतातरी गिताचा जीव वाचला असता अशा संतप्त प्रतिक्रिया घटनास्थंळी व्यक्त होत होत्या.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here