डफळापूर,वार्ताहर :डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील 11 गावांच्या विकासासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1 कोटी 9
हाजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून सर्व गावातील कामे लवकरच सुरू होणार असल्याचे माहिती जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी दिली.यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण आकाराम मासाळ उपस्थित होते.जत पश्चिम भागातील महत्त्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ विकासापासून वंचित होता.अनेक गावातील दलित वस्ती सुधारण्याची गरज होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात आम्ही या वस्तीचा विकास व्हावा यासाठी सतत निधीची मागणी करत होतो.समाज कल्याण प्रत्येक बैठकीत या मतदार संघातील गावांची परिस्थिती मांडली आहे.त्याचा विचार करून प्रशासनाने या गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत
पेव्हिंग ब्लॉक,सिमेंट रस्ते,गटारी,हायमास्ट लाईट आदी कामासाठी हा 95 लाखाचा निधी मंजूर केला आहे.तालुक्यातील इतर मतदारसंघाचा विचार करतात हा सर्वाधिक निधी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.मतदारसंघातील
डफळापूर : 1)आंबेडकर नगर – पेव्हिंग ब्लॉक व कॉंक्रीट गटर 16 लाख, 2)अण्णाभाऊ साठे नगर पेव्हिंग ब्लॉक व कॉक्रीट रस्ता – 11 लाख, 3)आंबेडकर नगर,अण्णाभाऊ साठे नगर,रोहिदास नगर,पंचशीलनगर हायमास्ट लाईट – 6 लाख,
कुडणूर :1)आंबेडकरनगर आठवलेवस्ती – हायमास्ट लाईट 3.60 हजार,
धावडवाडी : 1) आंबेडकर नगर-हायमास्ट लाईट 3.60 हाजार,
कंठी : 1) पंचशीलनगर – रस्ते व पेव्हिंग ब्लॉक – पाच लाख, 2) पंचशील लांडगे,ऐवळे वस्ती – हायमास्ट लाईट- 3.60 हाजार,
डोर्ली – 1) आंबेडकर नगर व रमाईनगर – हायमस्ट लाईट 3.60 हाजार, 2)आंबेडकर नगर व रमाई नगर – पेव्हिंग ब्लॉक 6 लाख,
बाज : 1) आंबेडकर नगर – रस्ता कॉंक्रीट 6 लाख आंबेडकर, 2) आंबेडकरनगर- बंदिस्त गटार 4 लाख, 3) आंबेडकर नगर- हायमास्ट लाईट 2.40 हाजार,
मिरवाड : 1) आंबेडकर नगर-हायमास्ट 4.80 हाजार,
खलाटी : 1) पंचशील नगर-समाज मंदिर बांधकाम- 6 लाख 90 हजार,
बेंळूखी : 1) आंबेडकर नगर – हायमस्ट 2.40, 2) महात्मा फुले वसाहत हायमास्ट 2.40 हाजार,
जिरग्याळ :1) आंबेडकर नगर,चर्मकार वसाहत,रोहिदास नगर – पेव्हिंग ब्लॉक – 10 लाख,
शिंगणापूर :1) आंबेडकर नगर,लक्ष्मी नगर-हायमस्ट 3.60 हाजार असा निधी उपलब्ध झाला आहे.






