जत | राजे रामराव महाविद्यालय जतचा हेनान विद्यापीठाबरोबर आंतरराष्ट्रीय सामजस्य करार |

0
5

जत,(प्रतिनिधी):जत तालुक्यातील राजे रामराव महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने घेण्यात आलेला तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पदार्थ विज्ञान विभागाच्या हेनान विद्यापीठ,चीन याच्यासोबत आंतरराष्ट्रीय सामजस्य कारारावर सह्या करण्यात आला.यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.अभयकुमार साळुंखे कतार युनिव्हर्सिटी,चीनचे प्रोफेसर अबूबक्र अब्दुल्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठलराव ढेकळे विभागाचे प्रमुख डॉ आप्पासाहेब भोसले व संजय लठे यावेळी उपस्थित होते.या आंतरराष्ट्रीय कराराने महाविद्यालयातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना परदेशात जाऊन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे .या सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून डॉ संजय लठ्ठे यांनी काम पाहिलं या पूर्वी राजे रामराव महाविद्यालयाने 2016 मध्ये टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स,जपान याच्याबरोबर पहिला आंतरराष्ट्रीय करार झाला होता व 2018 मध्ये दुसऱ्या करार हेनान युनिव्हर्सिटी, चीन बरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाला या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

फुजिशिमा-तेरेसिमा अवार्ड
महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातील एम.एस्सी व बी.एस्सी मध्ये प्रथम येणारा विद्यार्थ्यांना हा अवार्ड दिला जातो. व जपान कडुन आर्थिक मदत दिली जाते .या अवॉर्डचे मानकरी आहेत एम.एस्सी मधून कु.तेजस्विनी शिंदे व बी.एस्सी मधून कु मनीषा माने यांना फुजिशिमा-तेरेसिमा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.अभयकुमार साळुंखे कतार युनिव्हर्सिटी, चीनचे प्रोफेसर अबूबकअब्दुल्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठलराव ढेकळे विभागाचे प्रमुख डॉ आप्पासाहेब भोसले व संजय लठ्ठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 टजत महाविद्यालयची एम.एस्सी मधून कु.तेजस्विनी शिंदे व बी.एस्सी मधून कु मनीषा माने यांना फुजिशिमा-तेरेसिमा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here