मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बापास बेदम मारहाण बिंळूर मध्ये संतापजनक घटना

0
7

चार जणावर पोक्सो अंतर्गत कारवाई

जत,प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या बापालाच गंभीर मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार बिंळूर ता.जत येथे घडला.याप्रकरणी त्या चार जणावर जत पोलीसात पोक्सो अंतर्गत करण्यात आली.गुरूबसू महादेव गडीकर,प्रंशात महादेव गडीकर,बसवराज गेज्जी,मुरग्याप्पा गडीकर(सर्व जण रा.बिंळूर) अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत.त्यांच्यावर 354,व पोक्सो कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे.

जत शहरातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक, व महाविद्यालयीन शिक्षणासाठी खिलारवाडी,बिंळूर,एंकूडी,बसरग्गी,गुगवाड,आदी परिसरातील मुली बसने येतात.गुरूवारी बिंळूर येथील एक अल्पवयीन मुलगी जत येथून बिंळूूूरकडे जात असताना गुरुबसू गडीकर याने तिची छेड काढली व तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.  तिने घरी गेल्यावर हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला वडील दुसऱ्याला याचा जाब विचारण्यासाठी गेले असता गुरु बसू त्याचा भाऊ प्रशांत,बसवराज केज्जी,मुरग्याप्पा गडीकर यांनी वडिलांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत बेदम मारहाण केली.

 यात मुलीचे वडील जखमी झाले आहेत.त्यांनी गुरूवारी रात्री उशिराने जत पोलीस ठाणे गाठत फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केल्याने गुन्हा दाखल केला.याप्रकरणी चौघांनाही अटक केली आहे.

दरम्यान जत शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या शाळकरी मुलीची सुरक्षितात या घटनेनी
पुन्हा धोक्यात आली आहे. मुलीच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे निर्भया पथक कोमात गेले आहे. गेले काही दिवस शाळा,स्टँड व विविध चौकात फिरणारे पथक दिसेनासे झाले आहे.त्याशिवाय पथकातील पोलीसांची कारवाई थंडावल्याने रोडरोमीयो,टवाळखोरांचे उपद्रव वाढले आहेत.अनेक मुलीची अशी छेडछाड केली जाते.काही मुली घरात सांगितल्यावर शिक्षण बंद होईल या भितीने तक्रार करत नाहीत.त्यामुळे असे प्रकार दिवसेन् दिवस वाढत आहेत.अशा रोडरोमीयोचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांतून होत आहे.

राजकीय पाठबंळावर टवाळखोरी वाढली

जत शहरासह तालुक्यातील गावातील टवाळखोरी करणारी मुले कोणत्या कोणत्या राजकीय गटात असतात.त्यामुळे पोलीसांनी एकाद्या टवाळखोरावर कारवाई केली,तर अनेकवेळा राजकीय ने क्या ता दबाव अधिकाऱ्यांवर येतो.त्यामुळे कारवाईला मर्यादा पडत आहेत.सर्वांची स्वच्छता करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची जत आता गरज आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here