डफळापूर नजिक अपघातात एक ठार,दोन जखमी सिंमेट डंम्पर व दुचाकीची धडक

0
3

  चुलत सासूचे उत्तरकार्यासाठी आलेल्या सांगलीतील दिघे कुंटुबियावर काळाचा घाला

मयत सोपान दिघे 

जखमी शुभम दिघे,नम्रता दिघे

जत,प्रतिनिधी : जत-सांगली रोडवरील डफळापुर नजिक दुचाकी व भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट डंम्परचा समोरासमोर अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. घटना सायंकाळी साडेचार वाजता घडली.अशोक सोपान दिघे (वय-52,रा.शंभरफुटी रोड,सांगली)असे ठार झालेल्याचे नाव आहे,त्यांचा मुलगा शुभम (वय-19),व मुलगी नम्रता (वय 14) हे गंभीर जखमी झाले आहेत.जत पोलीसात याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. डंपर चालक विठ्ठल मल्हारी गायकवाड (रा.वरवडे,ता.माढा,जि.सोलापूर)याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, जत येथील प्रताप चव्हाण यांच्या बहिणीचे पती व सांगली एमआयडीसीत नोकरीस असणारे अशोक दिघे व त्यांचे कुटुंबीय त्यांची जत येथील चुलत सासू नलिनी विलास चव्हाण यांच्या निधनाच्या तेरावा दिवसाचे उत्तरकार्य करण्यासाठी दोन दिवसापुर्वी जतला आले होते.दोन दिवसानंतर गुरुवारी गोड करून अशोक दिघे व त्यांचे दोन मुले ज्यूबीटर (एमएच-10,सीझेड-8634) ने सांगली निघाले होते.तर त्यांची पत्नी अनिता व अन्य कुटुंबीय मागे खाजगी वाहनातून सांगली कडे चालले होते.दरम्यान डफळापूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील चव्हाण वस्तीनजीक कोकळे कडून भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट डंपर (एमएच-12,क्यू -3309)ने सोपान दिघे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात सोपान दिघे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.तर त्यांची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली आहेत.त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.पाठीमागून आलेल्या सोपान दिघे यांच्या पत्नी व कुटुंबीयांनी त्यांना उपचारार्थ मिरज येथे दाखल करत,जत  पोलिसांना अपघाताची माहिती दिली.पोलीसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत,घटनेता पंचनामा करून डंपरचालकासह दोन्ही ताब्यात घेतले आहेत. दरम्यान जत येथील प्रताप चव्हाण कुटुंबीय एका दुःखातून सावरत असतानाच त्याच्या मेहुण्याच्या निधनाचे दुसरे दुःख त्यांच्या कुटुंबीयावर कोसळले. त्यामुळे जत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here