जत,प्रतिनिधी : जत येथील विवेक-बसव प्रतिष्ठान यांच्यावतीने जगद्गुरु स्वामी विवेकानंदांच्या जयंती प्रित्यर्थ “कॅन्सरला ओळखू या”विषयावर डॉ. दीपा पाटील (कॅन्सर सर्जन)यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयुरेश्वर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील मयुरेश्वर हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.गतवर्षी “जत मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन केले होते.यंदा तालुक्यात कॅन्सरसारख्या दुर्धर व गंभीर आजारांवरील जागृकता व्हावी या उद्देशाने रविवार 13 जानेवारी 2019 जत येथील बचत भवन(एसआरव्हीएम हायस्कूल समोर)सांयकाळी 5 वाजता” कॅन्सरला ओळखू या”या विषयावर कॅन्सर सर्जन डॉ.दीपा पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. शरद देसाई प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. पट्टनशेट्टी यांनी केले.






