जत,प्रतिनिधी : जत येथील प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ,सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त उमा नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस व उमा नर्सिंग कॉलेज व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर व मूकबधिर विद्यालयात फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.बुधवारी सकाळी डॉ.आरळी यांचा दोन्ही संस्थातील कर्मचाऱ्यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त नर्सिंग कॉलेजच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.34 रक्तदात्याने रक्तदान केले.जत येथील मुकबधिर विद्यालयातील मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.रवींद्र आरळी,गुड्डापूरचे स्वामीजी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्राचार्य बि.एस.माळी, महादेव कुंभार चंद्रकांत गुड्डोडगी,डॉ. विद्याधर किट्टद,सुनिता दवे,गुरूशांत माळी,अमोल वाघमोडे,काजल नेगांधी,स्नेहल पांढरे,प्रंशात गेजगे,शंकरेम्मा बिराजदार,बाळम्मा पाटील,गजानन मळ्ळी,संतोष कांबळे,विद्या माळी यांनी कष्ठ घेतले.यावेळी सर्व विद्यार्थी,कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना गुड्डापूरचे स्वामीजी,मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.





