जत,प्रतिनिधी:समाजिक समता न्याय व्यवस्थेला प्राध्यान देणारे ,व जत तालुक्यात दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकर्यासाठी चारा छावणाची संकल्पना,व दुष्काळात पाण्याच्या टाक्या वाटप करणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज हे आधुनिक युगातील संत असल्याचे उद्गार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी काढले.ते जत येथे पाण्याची टाकी सुपूर्द केली.यावेळी ते बोलत होते. यावेळी चिकलगी भुयारचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज,मोकाशेवाडीचे सरपंच आण्णासाहेब गायकवाड ,नवज्योत अॅग्रोटेकचे लिंबाजी सोलनकर ,महावितरणचे कार्यकारी अभियंता सानप साहेब,मानवधिकारी संघटनेचे पुणे अध्यक्ष संजय धुमाळ साहेब,दत्ता सावळे ,बसवराज बिराजदार मारोळी,विलास बाबर आदी उपस्थित होते . कांबळे म्हणाले की,माडग्याळ येथे प्रकाशराव जमदाडे युथ फौडेशने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात तुकाराम बाबानी पत्रकार हे नेहमीच सामाजिक बांधलिकी जोपसातात .त्याकरिता 158 दिवस दुष्काळ संघर्षाचा याअंतर्गत पाण्याची टाकी देण्याचे आश्वासित केले होते.यावेळी तुकाराम महाराज महाराज म्हणाले जत तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती उदभवली आहे.त्याकरिता दुष्काळग्रस्ताना दिलासा देणार आहे.संख येथे चालू होणार्या मोफत चारा छावणी करिता जनावरांची नोंदणी करावी असेही आवाहन यावेळी केले. पहिल्या टप्प्यात पाणी टाकी व्हसपेठ,दरिबडची ,कोतेबोबलाद,करेवाडी,बालगाव,संख,अंकलगी या गावात जावून जनतेची मानसिकता तयार करुन उपलब्ध पाणी ठिकाणी गावात पाणी टाकी ठेवून पाणी देणार असल्याचे सांगितले.