स्व.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त जतेत मंगळवारी दिव्यांग शिबीराचे आयोजन

0
7

जत,प्रतिनिधी : स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त विक्रम फौंडेशन जत व शहर काँग्रेसच्या वतीने आज ता.8 ला दिव्यांग शिबीर आयोजन केले आहे.अशी माहिती

विक्रम फौंडेशनच्या वतीने देण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा बँकेचे विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.या शिबिरात दिव्यांगासाठी व्हील चेअर, तीन चाकी सायकल, इलेक्ट्रिक सायकल हे साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.तर वय वर्षे 5 ते 15 वयोगटातील दिव्यांगासाठी जयपूर फूट देण्यात येणार आहे. तरी जत तालुक्यातील दिव्यांगानी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान यापुर्वी फांऊडेंशच्या वतीने या अगोदर 28 नोव्हेंबर 2018 रोजी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला जत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी चांगला प्रतिसाद  दिला  होता.त्यामुळे या शिबिराचा दुसरा टप्पा म्हणून  पुन्हा आज दि.8 रोजी स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांच्या जंयतीचे औचित्य साधून हे शिबीर ठेवण्यात आले आहे.यावेळी अप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग यांनी दिली. यावेळी पुंडलिक दुधाळ,नगराध्यक्ष  सौ.शुभांगी बन्नेनवर,राजेंद्र माने,नगरसेवक इकबाल गवंडी, श्रीकांत शिंदे, सुजय शिंदे, युवराज निकम, निलेश बामणे, भुपेंद्र कांबळे, नामदेव काळे, आप्पू माळी, साहेबराव कोळी, इराणा निडोनी, फिरोज नदाफ, मुन्ना पखाली, राहुल काळे, विकास माने, गणी मुल्ला, आकाश बनसोडे, सलीम नदाफ, संतोष भोसले, कुणाल शिंदे, गणेश गिड्डे आदी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here