माडग्याळ, वार्ताहर : जनतेच्या मनातील प्रक्षोपला चालना देण्याचे काम सोशल मिडियातून होतयं.जनतेतील आचार-विचार,आदान-प्रदान यावर विचारमंथन पत्रकारांनी करावे.समाजात वैचारिक गुसंळन होवून प्रबोधन होणे गरजेची आहे.असे प्रतिपादन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.प्रकाश जमदाडे फांऊडेंशच्या वतीने माडग्याळ येथे तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकारदिनी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ठोंबरे बोलत होते.
यावेळी तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ अर्चना वाघमळे,माजी सभापती आप्पाराया बिराजदार,मंगल जमदाडे, पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण,माडग्याळचे संरपच अप्पू जत्ती,मुख्याध्यापक महाजन,डॉ.हिट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.ठोंबरे पुढे म्हणाले,सोशल,इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या जमाण्यातही पिंट मिडियाचा ताकत टिकून आहे.त्यातील स्वांतत्र कायम राहण्यासाठी प्रयत्न व्हावा.दुसऱ्याच्या विचारावर दडपण आणण्याची पध्दत बंद करण्याची गरज आहे. पत्रकाराला मुक्त पध्दतीने काम करू द्यावे.जात,धर्माचा विसर पडला तरचं देशाचे भविष्य घडू शकते.नागरिकत्वाचे गुण समाजात नसल्याने प्रशाकीय,धार्मिक,राजकारणात पध्दत अवलंबली जात आहे.त्यामुळे ही समाजातील विकृत्ती बदलविणे महत्वाचे आहे.देशात असणारी राज्यघटना जागृत आहे.त्यामुळे सध्याच्या विस्कळीत समाजाला बांधून ठेवले जाते.त्यामुळे राज्यघटनेचा अभ्यास करावा.वृत्तमान पत्रानी लोकमत निर्माण करण्याची गरज आहे,असेही यावेळी ठोंबरे म्हणाले.संत तुकाराम महाराज म्हणाले, जत तालुक्यातील दुष्काळ निवार्नाथ केलेल्या 158 दिवस दुष्काळशी संघर्ष यातून तालुक्यातील जनतेला मदत करत आहेत. त्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे.
प्रकाश जमदाडे म्हणाले,शासकीय नोकरी करत असताना राजकारणात येण्याच्या महत्वाच्या टप्यात पत्रकारांनी मोठे योगदान दिले.त्यामुळे राजकारणातील ऐवढे मोठे यश मिळाल आहे.तालुक्यातील ज्वलंत प्रश्नावर यापुढे पत्रकारांनी आवाज उठवावा.
माडग्याळ ता.जत येथे पत्रकारदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, सभापती प्रकाश जमदाडे व मान्यवर





