कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस,बसपा लायन्स क्लबच्यावतीने पत्रकाराचा पत्रकारदिनी गौरव

0
17

जत,प्रतिनिधी : 6 डिंसेबर पत्रकार दिनानिमित्त जत तालुक्यातील पत्रकारांचा विविध सामाजिक संघटना,पक्ष,कार्यालय कडून सम्मान करण्यात आला.सकाळी बसपाच्या वतीने विश्रामगृहावर शहरातील पत्रकारांचा वही,पेन,शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेेेेळी बसपचे नेते अतुल कांबळे,तानाजी व्हनकडे,किरण शिंदे,नितिन शिवशरणं,जक्काप्पा सस्ते,महादेव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्याकडून शहरातील पत्रकाराचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष इकबाल गांवडी,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,नगरसेवक स्वप्निल शिंदे,बाजी केंगार, आदी मान्यवर उपस्थित होते.

माडग्याळ ता.जत येथे प्रकाशरावजी जमदाडे फांऊडेंशच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारिता आजची व उद्याची यावर व्याख्यान झाले.त्याचबरोबर पत्रकारांचा गौरव करण्यात आला.कॉग्रेसच्या वतीने कॉंग्रेस नेते विक्रम सांवत यांनी पत्रकाराचा गौरव केला.यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांना शाल,श्रीफळ व जतची ग्रामदेवता श्री.यलम्मादेवीची प्रतिमा भेट दिली. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडक,आप्पाराया बिराजदार,नगरसेवक नाना शिंदे,निलेश बामणे,गणेश गिड्डे,आंवढीचे उपसंरच श्री. बाबर,प्रदिप कोडक आदी मान्यवर उपस्थित होते.सांयकाळी भाजपा नेते डॉ.रवींद्रआरळी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबच्यावतीने पत्रकारांचा वही,पेन,शाल देऊन गौरव केला.लायन्स क्लबचे नेते राजेंद्र आरळी व तालुक्यातील लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

जत येथे कॉग्रेसच्या वतीने जेष्ठ पत्रकार दिनराज वाघामारे व मारूती मदने यांचा सत्कार करताना कॉंग्रेस नेते विक्रम सांवत,आप्पाराया बिराजदार,नाना शिंदे,बाबासाहेब कोडग,निलेश बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here