डफळापूर,वार्ताहर : येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रांरभी माजी सभापती देवयांनी गावडे व मनिषा माळी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाले.डॉ.देवयानी गावडे म्हणाल्या,सावित्रीबाई फुले यांनी सोसलेले कष्ठ व त्याग यामुळे महिला सन्मान झाला.जेव्हा महिलांना चुल अन् मुल या स्थितीत जीवन जगत होत्या त्यावेळी समाजाच्या विरोध स्विकारून स्ञी शिक्षणाची मशाल लावली.त्यामुळे महिलासाठी आज सर्वकाही शक्य झाले आहे.यावेळी संरपच बालिका चव्हाण प्रमुख उपस्थित होत्या.महिलांच्या हळदी-कुंकू,रांगोळी,खो-खो,सह अन्य स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी ग्रा.प.सदस्या मालन गडदे,जयश्री बोराडे, कल्पना कोरे,राणी सुतार,अश्विनी पोतदार,प्रियंका चव्हाण, शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होत्या.मुख्याध्यापक भाऊसो शिंदे,शिक्षक,शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
डफळापूर येथील विवेकानंद स्कूलमध्ये सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करताना डॉ.देवयांनी गावडे,मनिषा माळी आदी





