गुरुबसव विरक्त मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, सभामंडपाचे उद्घाटन

0
6

संख,वार्ताहर:संख (ता-जत) येथील श्री. गुरुबसव विरक्त मठात श्री. गुरुबसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि सभामंडपाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचन कार्यक्रम, ग्रामदैवत लायव्वादेवीची पालखी मिरवणूक सोहळा आणि 1001 सुहासिनींनीची ओटी भरणे असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

श्रीमनी प्र.मुरगेंद्र महास्वामीजीं यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवृत्त प्राचार्य रामू फुटाणी,तमन्ना बागेळी,शिवाणणा हुबनुर,मुरग्याप्पा घाळी, बाबुराव रजपूत, बसण्णा येळदरी यांच्या पुढाकाराने संख येथील मठात गेल्या सहा दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीगुरुबसव विरक्त मठाच्या समोर बांधण्यात आलेल्या सभामंडपचे उद्घाटन व वास्तूशांती विधी झाले. नव्याने तयार करण्यात आलेल्या श्रीगुरुबसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात झाली. होम हवन, वेदमंत्रोपचारात,अभिषेक,आणि विधिवत पूजाअर्चाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.अतिशय मंगलमय आणि श्रंद्धापूर्ण वातावरणात झालेल्या मूर्तींच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संख गावात नवचैतन्य प्राप्त झाले होते.यावेळी 1001 सुहासिनींनी एकाच रंगाची साडी परिधान करून श्रीगुरुबसव मूर्तीची ओवाळणी व आरती करून आशीर्वाद घेतले.सुहासिनींनीची ओटी भरणेचा कार्यक्रमही यावेळी पार पडला.कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.भाऊसाहेब पवार यांनी स्वतःच्या खर्चाने सर्व सहभागी 1001 महिलांना एकाच रंगाच्या साडीचे वाटप केले. एकाच रंगाची साडी परिधान केल्याने एक वेगळेच धार्मिक,भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. या दानशूरपणाबद्दल डॉ.पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.  महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.गेल्या आठवड्यापासून गदग येथील पट्टूरेश्वर महास्वामीजी यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले.परिसरातील रुग्णांना डोऴ्याच्या आजारावर मोफत मार्गदर्शन आणि उपचार मिळावे म्हणून नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात विजयपूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ प्रभुगौडा पाटील यांनी नेत्ररूग्णावर उपचार केले. यात 250 हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला. गेल्या सहा दिवसापासून चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बसवराज बिरादार(येगापगोळ)यांनी अन्नदानाचे वाटप केले.कार्यक्रमास आमदार विलासराव जगताप  यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. बसवन बागेवाडीचे सिद्दलिंग स्वामीजी,सांभाळ (बीड)चे परमपूज्य विजयकुमार स्वामीजी यांची खास उपस्थिती लाभली.

गुरुबसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि सभामंडपाचे उद्घाटनवेळी उपस्थित 1001 सुवासिनी,कार्यक्रमात मार्गदर्शन करताना धार्मिक गुरूवर्य 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here