कवठेमहांकाळ : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली.प्रांरभी सौ.कविता मेहरा यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने झाली.त्यावेळी संस्थापक मोहन माळी,सचिव सौ.नेहा माळी, समुपदेशक सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते. साक्षी कोळेकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .’मी सावित्री बोलतेय’असे सांगत सर्वांची मने जिंकली.पी.जे.कलमडे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतीकारक योगदान आहे.मोहन माळी यांनी महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा पेलण्याचे सामर्थ्य सर्वांनाच मिळाले.





