खिलारवाडीत दिराने केला भावजयचा खून,अनैतिक संबधाला नकार दिल्याने कृत्य,संशयित दीर व अन्य एकाला अटक

0
15

जत,प्रतिनिधी : खिलारवाडी ता.जत येथील भावजयीचा अनैतिक संबंधातून दिराने सत्तूरने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार रविवार उघड झाला आहे.दिर -भावजय या नात्याला काळिमा फासणारी घटनेने तालुक्यातील खळबंळ उडाली आहे. जत पोलिसात सोमवारी याबाबतचा गुन्हा दाखल झाला.सुनीता भैयाजी लोखंडे (वय-35) खून झालेल्या भावजयचे नाव आहे.याप्रकरणी पांडुरंग कामू लोखंडे व त्याचा मित्र संजय कृष्णा सोनलकर(दोघे रा.खिलारवाडी) यांना पोलीसांनी अटक केली आहे.याप्रकरणी पती बयाजी रामू लोंखडे यांने फिर्याद दिली.घटना रवीवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घड़ली.अधिक माहिती खिलारवाडी बयाजी कामू लोखंडे व पांडुरंग कामू लोखंडे यां सख्या भावाची घरे एकमेकास लागून आहेत. पांडुरंग व सुनीता यांचे दिर-भावजयचे नाते आहे.

सुनीता व बयाजी दांपत्य शेतमजूरी करते.दोघांना दोन अपत्ये आहेत.त्यांचा सखा भाऊ पांडूरंग हा शेजारी राहतात.त्यामुळे भावजय सुनीता व पांडूरंग यांच्यात सतत संवाद व्हायचा. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. गेले अनेक वर्ष हे संबंध चोरी चुपके सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणाची माहिती पती बयाजीला लागली, त्याने दोघांनाही कडक शब्दात सुनावत असे प्रकार बंद करण्याचे सांगितले होते. त्यामुळे सुनिता पांडुरंगला टाळत होती.दुसरीकडे पांडुरंग सुनीताला भेटण्याचा प्रयत्न करत होता,परंतु दोन महिने त्याला सुनीता भेटत नव्हती. वैतागलेल्या पांडुरंगने सुनीताला भेटण्याचा तो दिवस निवडला, रविवारी सायकांळी सुनिताचा पती, लग्नकार्यासाठी घराबाहेर गेला होता. मुले झोपली होती.मित्र संजय सोनलकरला बाहेर उभे करत पांडुरंगने सुनीताच्या घरात घुसत,तिच्या हाताला धरून ओढत त्यांच्या घरात आणले. त्याने माझ्याबरोबरचे अनैतिक संबंध का तोडले, ते पुन्हा प्रस्थापित कर असे म्हणून दबाव टाकला. मात्र सुनीताने त्यास नकार दिल्याने पांडुरंगने सोबत आणलेल्या सत्तुरने सपासप वार केले.त्यात सुनितावर डोके,मान पाठीवर सुमारे 25 वॉर केल्याने गंभीर जखमा झाल्याने सुनिता जागेवर कोसळली, रक्तस्त्रावाने तिचा जागेवर मृत्यू झाला.दरम्यान त्याची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली.पोलिस तातडीने घटनास्थळी पोचहत सुनीताचा

मृतदेह ताब्यात घेत आरोपी पांडुरंग व मित्र संजय सोनलकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणाने खिलारवाडी परिसरात खंळबळ उडाली आहे.यापूर्वी अशाच पद्धतीचे अनैतिक संंबधाच्या संशावरून बापाने मुलीचा खून केला होता.त्यानंतर रवीवारी झालेल्या प्रकाराने पुन्हा खिलारवाडी चर्चेत आले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंवड करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here