जत,प्रतिनिधी : जत येथील श्री.यल्लमा देवी यात्रा काळात भाविकांच्यासाठी तीन टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केली आहे.यात्रेतील जनावरांचे प्रदर्शन ठिकाणी तीन टाक्या ठेवून त्यात टँकरद्वारे पाणी ओतून ते तेथील शेतकऱ्यांना व उपस्थित जनावरांनाही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.टँकर व टाक्याचे उद्घाटन तुकाराम महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सचिव सोमलिंग चौधरी,महेश चव्हाण,फिरोज खतीब,शेख साहेब उपस्थित होते. त्याशिवाय यात्रेतील लाखो भाविकांच्या साठी ठीक-ठिकाणी टाक्या ठेवून त्यात टँकरने पाणी ओतून भाविकांना उपलब्ध करून दिले आहे.कायम सामाजिक कार्यासाठी काम करणारे तुकाराम महाराज यांची सर्व यंत्रणा नियोजनबध्द भाविकांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करत आहे.स्वतः तुकाराम महाराज उपस्थित राहून सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जत येथील जनावरे प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्याचे उद्घाटन करताना तुकाराम महाराज सोमलिंग चौधरी व मान्यवर





