बाजमध्ये जुन्या वादातून मारामारी,दोन जखमी

0
4

पब

जत,प्रतिनिधी : बाज ता.जत येथे जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या माराहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले.घटना ता.18 रोजी दुपारी साडेबारा वाजता बाजमध्ये घडली.आबासाहेब नाना खरात,विकास विलास दुधाळ अशी जखमीची नावे आहेत.आबासाहेब खरात याने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी सात जणाविरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,आबासाहेब व विकास हे लग्नासाठी जात असताना प्रमोद भीमराव गडदे,विकास रघु गडदे,अशोक बिरू गडदे, विकास प्रकाश बंडगर, देवाप्पा किसन कोंडिगिरे, प्रवीण तुकाराम खरात, मिलिंद संभाजी गडदे यांनी गाडी अडवी लावून तलवार,गज,काठ्याने मारहाण केली.त्यात आबासाहेब व विकास गंभीर जखमी झाले.दरम्यान उपचार घेऊन त्यांनी मंगळवार ता.26 रोजी जत पोलिसात फिर्याद दिली.अधिक तपास अमोल चव्हाण करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here