गुगवाड,वार्ताहर : बिंळूर-जत रोडवर रस्ते कामावरील कामगारांस दुचाकीने धडक दिल्याने कामगारांचा मुत्यू झाला.घटना मंगळवार सायकांळी सातच्या दरम्यानघडली.पराप्पा चन्नाप्पा अंदानी(वय-65,रा.गुगवाड)असे मयत कामगाराचे नाव आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,बिंळूर-जत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे.मंगळवारी डांबर गरम करण्यासाठी पराप्पासह काही कामगार सायकांळ पर्यत थांबले होते.पराप्पा हे काम आटपून गुगवाड कडे जाण्यासाठी रस्त्याकडेला गाडीची वाट पाहत थांबले होते.दरम्यान वज्रवाड हून जतकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ज्ञानेश्वर संगाप्पा बिराजदार यांच्या मोटारसायकलीने रस्त्याकडेला उभारलेल्या पराप्पास जोराची धडक दिली.त्यात पराप्पास गंभीर जखमी झाले होते.
बिंळूर येथे खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून कुंटूबियांनी त्यांना रात्र झाल्याने गुगवाड येथे नेहले.दरम्यान पराप्पास जास्तच त्रास होऊ लागल्याने बुधवारी जत ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचार्थ आणत असताना वाटेत त्यांचे निधन झाले.धडक दिल्यानंतर दुचाकी चालक ज्ञानेश्वर बिराजदार फरारी झाला आहे. त्याच्याविरोधात बेजबाबदारपणे वाहन चालवून मुत्यूस कारण ठरल्याने गुन्हा दाखल झाला आहे.संगाप्पा यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,नातवडे असा परिवार आहे.





