शेगाव,वार्ताहर: शेगाव ता. जत येथे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी दाखल झाले.शेगावच्या निकम वस्ती येथे आलेल्या पाण्याचे पूजन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरात पाणी आल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.परिसरातील शेती यामुळे बहरणार आहे. भविष्यात मोठी पिके घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल.शेगावचे स्थानिक नेते व आ.जगताप यांच्या पाठपुराव्याने परिसरात कृष्णामाई खळखळू लागली आहे.माजी सरपंच लक्ष्मण बोराडे,वसंत शिंदे,आबासाहेब सावंत, आर.डी.शिंदे,शहाजी बोराडे , नानासाहेब निकम,शहाजी काशीद,बाळासाहेब निकम,माजी सरपंच कृष्णदेव भोसले,अविनाश सावंत,संतोष जगताप,सचिन जगताप,दिंगबर निकम,आदी उपस्थित होते.
शेगाव ता.जत येथे आलेल्या पाण्याचे पुजन करताना आ.विलासराव जगताप व मान्यवर





