सोनलगीत वाळू तस्करी करणारे दोन ट्रक्टर पकडले

0
3

जत,प्रतिनिधी : सोनलगी,व संख ता. जत येथील बोर नदी पत्रात बेकायदा वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले.त्यात सुमारे तीन ब्रॉस वाळूचा साठा जप्त करून प्रत्येकी दीड लाखाचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. संख तहसीलदार अर्चना पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी वाढली आहे.याबाबतचे  बुधवार ता. 20 ला दैनिक संकेत टाइम्सने प्रकाशित केले होते.त्याची गंभीर दखल घेत महसूल विभाग सतर्क झाला आहे.अनेक दिवसापासून थंडावलेली वाळू विरोधी कारवाईने वाळू तस्कर सुसाट झाले होते.मात्र बातमीनंतर खंडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने नव्याने वाळू तस्करी ठिकाणावर छापा सत्र सुरू केले आहे. पुन्हा कारवाया सुरू झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.महसूल विभागाच्या पथकाने भोर नदीपात्रात सर्च ऑपरेशन केले.त्यात बुधवार ता.20 संख येथे भोर नदी पात्रात हणमंत तुकाराम लोहार रा.संख यांच्या मालकीचा ट्रैक्टर पकडला,तर ता.21ला दुपारी सोनलगी नजिक लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन कंपनीचा,स्वराज्य 744 एफई कंपनीचे दोन ट्रॅक्टर वाळू तस्करी करताना आढळले.दोन्ही ट्रक्टर ताब्यात घेण्यात आले आहेत.त्यांच्या मालकांचा शोध सुरू आहे.तलाठी विशाल उदगिरे,बाबासाहेब जगताप,नितिन कुंभार,गणेश पवार,विलास चव्हाण,दुष्यंत पाटील,औंदुबर चव्हाण यांनी कारवाई केली.अधिक तपास हवलदार कोळी करत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here