पाणी योजनेची बदनामी करणाऱ्यावर दावे ठोकणार : बिरादार

0
4

संख,वार्ताहर: संख (ता.जत) येथील पेयजल पाणीपुरवठा योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही.मात्र काही लोकांनी योजनेचा अप्रचार करून बदनामी चालवली आहे.त्यांनी त्यांचे असे प्रकार थांबवावेत. अन्यथा त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष दयगोंडा बिरादार यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.
ते म्हणाले,मुळात पाणी योजनेत कोणतेही नियमबाह्य काम झालेले नाही. शिवाय झालेली नाही सर्व कामे शासनाच्या चौकटीत आहेत. सध्या योजनेचे काम अंतिम टप्प्याकडे आले आहे.गावातील काही जण कुणाचीतरी सुपारी घेऊन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत आमची बदनामी करत आहेत.त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला आहे. तो थांबवा अन्यथा आम्ही बदनामीचा दावा ठोकणार आहोत. त्याबाबत
कायदेतज्ञ्याकडून सल्ला घेत आहोत.मुळात संख मधील नागरिकांना भविष्यातील 50 वर्षापर्यत कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी इतकी मोठी आखली आहे.त्यात आम्ही सर्व कामे नियमानुसार, दर्जेदार केले आहेत. येत्या काही दिवसात योजनेतून पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना उपोषणाचा इशारा देऊन काहीनी बदनामीचे षडयंत्र रचले आहे. त्याला यापुढे जशास तसे उत्तर देऊ असे बिरादार यांनी शेवटी म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here