तुरची-बबलेश्वर योजनेचे कुणीही श्रेय घेऊ नये : विक्रम सांवत

0
3

जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील 42 गावांना महत्त्वाची असणारी तुरची- बबलेश्वर पाणी योजना आता आकारास येत आहे.आम्ही गेल्या सहा वर्षापासून करत असलेले प्रयत्न आता सर्वांना समजले आहेत.त्यामुळे योजनेच्या कामाला गती आली आहे. असे असताना भाजप मधील काही मंडळी श्रेय घेण़्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र 2012 वर्षापासून आम्ही या योजनेसाठी पाठपुरावा केला आहे.आता आमदारकीचे डोहाळे लागलेले काहीजण शिष्टमंडळचा बागुलबुवा करत योजना पुर्ण करण्यासाठी आम्ही करत असल्याचा केवलवाणा कांगावा करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक,भूपेंद्र कांबळे,निलेश बामणे उपस्थित होते.

सावंत म्हणाले तुरची- बबलेश्वर योजनेसाठी आम्ही 2012 पासून लढत आहोत, त्यावेळी ह्याच मंडळीचा योजनेला विरोध होता.ती मंडळी आता योजना पूर्ण करतो असं म्हणतात.प्रत्यक्षात योजनेच्या सर्व बाबीचा आम्ही अभ्यास केला आहे. यापुर्वीच महाराष्ट्र, कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केला आहे.आताही गावोगावी जाऊन शेतकरी,ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत.त्यांना योजनेचे महत्त्व व आम्ही करत असलेले प्रयत्न याची माहिती देत आहोत.कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.जनतेला सर्व माहिती अाहे. पूर्व भागातील सतत दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कायमस्वरूपी पाणी देण्यास प्राधान्य द्यावे.तुबची-बबलेश्वर योजना आम्ही महत्त्वाची मानतो.जनतेच्या हितासाठी या योजनेवर काम करत आहोत. त्यामुळे योजना पूर्ण होण्यापर्यंत आमचा लढा कायम असेलं.यापुढे कुणीही ऊठून स्व:ताचा हशा करून घेऊ नये असेही यावेळी सांवत म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here