संखनजिक अपघातात 2 ठार दुचाकीचा वळणावर ताबा सुटल्याने घटली घटना : मयत दोघे सांगलीचे

0
6

संख,वार्ताहर ; संख – विजापूर रोडवरील संखपासून तीन किलोमीटर अंतरावरील मध्यम प्रकल्पाकडे वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.गुरूवार सकाळी सव्वा सातच्या दरम्यान घटना घडली. सुहास दशरथ गंभिरे(वय-29,रा.रामकृष्ण नगर,भारत सुतगिरणीमागे,कुपवाड),भालचंद्र सिद्राम निनगीबिद्री(रा.33,रा.दत्तनगर,बामणोली,सांगली)असे ठार झालेल्याची नावे आहेत.याबाबतचा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,भालचंद्र निगनीबिद्री हे मित्र सुहास गंभिरे यांच्या सोबत कपनिबर्गी कर्नाटक येथील पत्नीकडे दुचाकी क्र.एमएच-10,बीटी-2192 वरून निघाले होते.संखपासून तीन किलोमीटरवर असलेल्या मध्यमप्रकल्प वळणावर त्यांचा दुचाकीवरचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट गटारी कोसळली तर दुचाकीवरील दोघेही बाजूला फेकले गेले.रस्त्याकडेच्या दगडावर ते आदळल्याने डोक्यास जबर मार लागून दोघेही जागीच ठार झाले.मयत सुहास गंभिरे हे मराठा स्वराज्य संघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहेत.भालचंद्र निगनीबिद्री यांची दोन विवाह झाले आहेत. एक पत्नी दरिकोणूर ता.जत येथील तर दुसऱ्या कर्नाटकातील कपनिबर्गी येथील आहेत.दरिकोणूर येथील पत्नीस 2 मुली,1 मुलगा आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here