शेतीपंपाची बिले महिन्याभरात माफ होतील,निता केळकर : दुष्काळी उपाययोजनाचा भाग असलेला प्रस्ताव अंतिम टप्यात

0
2

जत,प्रतिनिधी: गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या जत तालुक्यातील शेतीपंपाचे पुढील महिन्यापर्यत माफ केले जाणार आहे. दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून हा मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत विद्युत महावितरणच्या संचालिका निता केळकर यांनी व्यक्त केले.
त्या जिल्हात प्रथमच जत येथे घेण्यात आलेल्या महावितरच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.यावेळी आ.विलासराव जगताप, डॉ.रविंद्र आरळी,सभापती सुशिला तांवसी, माजी सभापती सौ.मंगल जमदाडे,सभापती तम्मनगौडा रवीपाटील,मनोज जगताप, जि.प.सदस्या रेखा बागेळी,कविता खोत,चंद्रकात गुड्डोडगी, संजय तेली, शिवाप्पा तावंशी,तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील जत,संख विभागाच्या अभिंयत्याच्या अनागोंदी कारभाराचा पाठाच उपस्थित शेतकरी, व लोकप्रतिनीधी बैठकीत मांडला.
प्रभाकर जाधव म्हणाले,तालुक्यातील अतिरिक्त भार व अन्य कारणाने टान्सफार्म जळण्याचे प्रमाण मोठे आहे.संख,जत विभागातील टान्सफार्म बदलविण्यासाठी तब्बल महिनाभराचा कालावधी जातो.शेतकऱ्यांनी पैसे देऊनही अनेक दिवस कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.परिणामी पिकांचे नुकसान होते.जत तालुक्यात टान्सफार्म दुरूस्ती सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रंलबित आहे.तो व्हावा.निता केळकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.त्याशिवाय टान्सफार्म दुरूस्ती सेंटर सुरू करण्याबाबत तातडीने शासनास कळवू असे आश्वासन दिले.
तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या सौभाग्यवती योजनेची योग्य अमलबंजावणी होत नाही.तालुक्यातील हाजारो शेतकरी अनामत रक्कमा भरून कनेक्शन मिळण्याच्या वर्षान् वर्ष प्रतिक्षेत आहेत.कोसारीत अन्याय कारक टिसी बंद केला आहे. तालुक्यातील अधिकारी मनमानी करत आहेत.शेतकऱ्यांना उद्धट उत्तरे देतात.अशी तक्रार विक्रम ढोणे यांनी मांडली.
ग्राहक पंचायतीचे विद्याधर किट्टद यांनी तालुक्यातील घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांची बिले अव्वाच़्या सव्वा येत आहेत.अनेक त्रुटी व बेहिशोबी बिले लादली जात आहेत.ती पुर्वीप्रमाणे करावीत.ग्रांहकाची अधिकारी,कर्मचारी हेळसाड करतात.तक्रारीची माहिती व्यवस्थित दिली जात नाही.तक्रार बुकही कार्यालयात नाही.सर्व कारभार संशास्पद असल्याची तक्रार मांडली.
स्वता:चे पैसे घालून विद्युत यंत्रणा उभी केलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या खात्यावर पैसे पडून असूनही पैसे दिले जात नाहीत.याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली.अनेक गावात कमी जास्त क्षमतेचा विद्युत पुरवठा होत आहे. अनेक ग्रांहक शेतकऱ्यांच़्या तक्रारी तक्रारीचे निवारण केले जात नाही.बिले न भरल्यास कर्मचाऱ्यांच्या उद्दामपणाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रश्न बैठकीत मांडण्यात आले.
सर्व तक्रारीचे निवारण करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील,दुष्काळी तालुक्यातील घरगुती ग्राहक,शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करावा,अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा सुचना अधिकाऱ्यांऩा केळकर यांनी दिल्या.

जत येथील महावितरच्या आढावा बैठकी संचालिका निता केळकर, आ.विलासराव जगताप, डॉ.रविंद्र आरळी व मान्यवर

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here