दुष्काळी जत तालुक्याला सर्व उपाययोजना तातडीने द्या : सचिन मदने

0
1

 जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात गेले वर्षभर खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनाने जत तालुका गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करूनही तब्बल एक महिना झाला तरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही सोई सवलती दिल्या नाहीत.येत्या आठ दिवसात दुष्काळाच्या सर्व सोयी सवलती द्याव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन मदने यांनी दिली.
    मदने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. निसर्गाच्या विशेष मर्जीत नसलेला निसर्गाचा कोप असलेला हा तालुका या तालुक्यातील खरीप व रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. तालुक्यातील सर्व तलाव कूपनलिका कोरड्या पडलेल्या आहेत. शेतामध्ये पिक नसल्याने चाऱ्यासाठी जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना रानोमाळ वणवण करण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील जनता होरपळून निघत असताना राज्यातील व केंद्रातील भाजपचे सरकार मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत  आहे.गेल्या महिनाभरापूर्वी शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत.मात्र त्यातील एक ही योजना आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर असून अनेक शेतकरी आपली जनावरे कवडीमोल किमतीला विकून टाकत अाहेत.काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे कर्नाटकात पाठवलेली आहे. तालुक्यातील 23 गावातील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत.असे प्रस्ताव तहसिलदार कर्यालयास दिलेले आहेत. मात्र एकाही गावाला प्रशासनाने अद्याप टँकर सुरू केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दोन दोन किलोमीटरची पायपीठ करावी लागत आहे. त्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील जनावरांना चारा नसल्याने जनावरांची तडफड होत आहे.त्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अशी आमची मागणी आहे.तसेच गेल्या वर्षभरापासून विहिरीला पाणी नसल्याने अनेक इलेक्ट्रिकल मोटारी बंद आहेत,तरीही वीज वितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात वीज बिले दिली अाहेत. संपूर्ण वीज बिल शासनाने भरावे,तालुक्यातील मागेल त्याला रोजगार हमीची कामे द्यावीत अशा मागण्या पूर्ण न केल्यास येत्या आठ दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढू असा इशारा मदने यांनी दिला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here