जत,प्रतिनिधी : जत उप विभागागीय पोलीस अधिकारी म्हणून अनिकेत भारती यांची नेमणूक झाली आहे.बरेच दिवस रिक्त असलेल्या या विभागास नविन अधिकारी मिळाला आहे.यापुर्वीचे अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांच्या नंतर चांगला व कायमस्वरूपी अधिकारी गरजेचे होते.अनिकेत भारती यांच्या नेमणूकीने ती उणिव भरून निघणार आहे.यापुर्वी मिरज उपविभागीय अधिकारी म्हणून भारती कार्यरत होते.ते आज चार्ज घेतील अशी शक्यता आहे.जत,उमदी,कवटेमहाकांळ पोलीस ठाणे हद्दीतील क्राईट रेट कमी करणे,अवैध धंदे,व राजकीय झालर पांघलेल्या गुंडापुंडाचा बंदोबस्त करण्याचे आवाहन भारती यांच्या समोर आहे.