जत,प्रतिनिधी : सध्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवायांनी थैमान घातले आहे. चोरीतर नित्य नेमाने हद्दीतील कोणत्याना कोणत्या गावात तर होताच असतात, शिवाय मटका दारू अड्डे व वडाप, तीन पाणी जुगार अड्डा, गुटका तस्करी, हातभट्टी, गांजाची तस्करी,वाळूची तस्करी, चंदन तस्करी पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सर्व तस्करांचा बिमोड करून सुशासन देणारा दबंग अधिकारी या पोलीसठाण्याला मिळेल का ?अशी मागणी नागरीक करीत आहेत.
शिवाय छापेमारी किंवा इतर तत्सम कारवाई असतो परंतु हे अधिकारी महाशय आपल्या मर्जीतील पोलीसांना घेवून वाहनाचालंकाचा कोटा भरून काढत असल्याची देखील चर्चा आहे.कोणतीही धाडसी कारवाई न करता फक्त सेटलमेंट करून माया जमवणे इतकेच पोलिस ठाण्यात होत असल्याची देखील लोकांतून चर्चा आहे. सांगली जिल्ह्यातील जाता तालुका म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्यातून उमदी सारखा पूर्व भाग तर वाळवंट बरे असे वाटते यावर्षी दुष्काळी छाया गडद झाली आहे.काळ बदलतोय मात्र गुन्हेगारी संपायची नाव घेत नाही.
हेही वाचा: डफळापूर | कुडणूर, शेळकेवाडी पाणी योजनाची पाणी पुरवठा विभागाच्या अभिंयत्याकडून पाहणी |
त्याला कारण पोलिस यंत्रणा असल्याचे आरोप होत आहेत. कधी काळी उमदी म्हणजे जिल्ह्याच्या एका टोकाला असलेले गाव येथील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना 42 ते 45 गावे वाड्या वस्त्यांची सुभेदारी दिल्या सारखेच आहे. येथे पूर्वी अधिकारी यायला कचरत होते परंतु;आता उमदी पोलीस ठाणे म्हणजे जणू चरायू कुरण अशी अधिकाऱ्यांची मानासिकता झाली आहे. येथे येण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.आलेला अधिकारी,कर्मचारी परत जाण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव आहे.राजकीय सेंटलमेंटने सर्व अवैद्य धंदे, चौकात, उघड्यावर सुरू आहेत.
हेही वाचा: उटगीत शेतकऱ्यांची आत्महत्या,महादुष्काळ,कर्जास कंटाळून संपविली जीवनयात्रा, कर्जमाफी कागदावरच