आवंढी | उपसरपंचपदी आण्णासाहेब बाबर |

0
1

आवंढी,वार्ताहर  :आंवढी (ता.जत) येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी आण्णासाहेब बाबर यांची बिनविरोध निवड झाली.मावळतेचे उपसंरपच डॉ.प्रदिप कोडग यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर हि निवड करण्यात आला.गत निवडणूकीत काँग्रेसच्या सहाच्या सहा सदस्यांना विभागून प्रत्येकी दहा दहा महिने उपसरपंच पद देण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरविले होते. त्यानुसार डॉ. कोडग यांनी आपला कार्यकाळ पुर्ण होताच राजीनामा दिला होता. त्याजागी आण्णासाहेब बाबर यांची बिनविरोधच निवड करण्यात आली.

हेही वाचा: माडग्याळकरांना पिण्याचे पाणीही विकत घेण्याची वेळ सलग चार वर्षापासून दुष्काळ कायम,शेतकऱ्यावर गाव सोडण्याची वेळ

यावेळी बोलताना मावळते उपसरपंच कोडग म्हणाले, सरपंच व इतर सर्वच सदस्यांनी गत वर्षात एकत्रित राहुन गावच्या विकासास हातभार लावल्याबद्दल आभार मानले.वर्षभरात पदाला न्याय देण्याचे काम मी केले आहे. यापुढे सदस्य म्हणून गावच्या विकासात सर्वोत्तम योगदान राहिल.निवडीनंतर नुतन उपसरपंच आण्णासाहेब बाबर म्हणाले की, सरपंच व सर्व सदस्यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना सोबत व विश्वासात घेऊनच पार पाडीन.याशिवाय शासकीय योजना आणून विकास कामांना माझे प्राधान्य राहिल.

याप्रसंगी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच कोडग,ग्रामसेवक सौ.शितल शिंदे,सदस्य लालासाहेब देशमुख, संजय एडगे,सौ.मनिषा कुंभार,मुगाबाई कोडग,पार्वती कोडग,मालन गेजगे व कर्मचारी उपस्थित होते.

आंवढी ता.जत येथील उपसरपंचपदी आण्णासाहेब बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here