जत,प्रतिनिधी : दोन लाख लोकसंख्येच्या जत शहराची वाहतूक व्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्या वाहतूक पोलिसावर आहे ते वाहतूक पोलिस केवळ नाकाबंदी आणि तपासणीपुरती मर्यादित झाले की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.नाकाबंदीशिवाय अन्य ठिकाणी वाहतूक शाखा छिडीछूप झाल्याने या शाखेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची वाहतूक, राँगसाईड वाहतूक, सायलेंट झोन मधील ध्वनीप्रदूषण, पार्किंग, रॉकेल अधिकृत वापरणारी वाहने, वाळू तस्करी व वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजनांसह वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वाहतूक शाखेकडे आहे.वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण हटविण्याचे अधिकार या शाखेला प्राप्त आहेत.याशिवाय वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रंक अँन्ड ड्राईव्ह, फॅन्सी नंबर प्लेट, बेडरकार वाहने चालविण्याविरुद्ध मोहीम राबविण्याची जबाबदारी वाहतूक शाखेच्या खांद्यावर आहे.नोपार्किंग झोनमध्ये बोकाळलेला अवैध पार्किंग तथा अतिक्रमण काढण्याची जबाबदारी वाहतूकची आहे. या सर्व आघाड्यांवर या शाखेचे अपयश ढळढळीतपणे समोर येते.शहरातील बहुतांश व्यावसायिकांना पार्किंग दडपविली असताना आणि शेकडो-हजारो वाहने रस्त्यावर लागत असताना त्या वाहनावर कारवाई करण्यासाठी एखादी विशेष मोहीम राबविण्याचा मुहूर्त अद्यापही मिळालेला नाही.फुटपाथचे काय तर अर्धे रस्त्यावर फेरीवाल्यांची दुकाने बोकाळली असताना आणि रस्त्यावर खाद्यपदार्थाच्या हातगाड्या लागत असताना वाहतूक शाखेने घेतलेले मौन संतापजनक आहे. प्रत्येक चौकात बड्यांच्या प्रतिष्ठानांसमोर अनधिकृत पार्किंग सुरू केली जात आहे.मात्र त्यावर कारवाईन करता कारवाईचा बागुलबुवा उभा करण्यातच धन्यता मानली जात आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगसह अतिक्रमण उचलण्याची जबाबदारी जणूकाही केवळ नगरपालिकेची आहे, असा गोड गैरसमज करून घेतल्याने वाहतूक शाखेच्या अनेक कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत.एकूणच यंत्रणेच्या कार्यशिलतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
वाहतूक कोंडीने दररोज अशी कोंडी असते.
Attachments area