डफळापूर,वार्ताहर:जत तालुक्यातील दुष्काळी टप्प्यातील अनेक गावात अनेक परंपरांचे जतन केले जाते. अशीच एक परंपरा दिपावली पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थानी जोपासली आहे. ती म्हणजे गावातील गावाची वेस,मुख्य रस्त्यावरून ग्रामदैवताच्या मंदिराच्या समोर मेंढरं पळविण्याची परंपरा.तालुक्यातील जवळपास सर्वच गावात ही पंरपरा जपली जाते.तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढर पाळणे हा शेतीपुरक व्यवसाय केला जातो.दिवाळीला मेंढर पळविण्यात येतात.
हे पण वाचा :
लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्या जंयती निमित्त अभिवादन
दिपावली पाडव्याला गावातील तालुक्यातील गावा गावात मेंढर पालक कुटुंबातील लोक सकाळी लवकर उठून आपल्या घरातील मेंढरं रंगवून त्यांना हार फुले व पायात चाळ घालतात. रंगीबेरंगी नटविलेली मेंढरे गावातील ग्रामदैवत मंदिराच्या ठिकाणी आणली जातात व तेथे मंदिराला पाच वेढे काढण्याची प्रथा आहे. यावेळी दोन ग्रामस्थ आपल्या हातात रस्सी घेऊन ती जमिनीलगत टाकतात व वेडीवाकडी हालवितात. सर्व मेंढरे ही रस्सी चुकवून उंच उडी मारून पार करतात. यावेळी वरील बाजूला पाच फूट अंतरावर मानाचा नारळ बांधलेला असतो.
ज्याची मेंढरे तो नारळ प्रथम शिवतील त्याला तो नारळ आणि बक्षीस दिले जाते. यावेळी गावातील ग्रामस्थ,लहान मुले, तरुण यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.गावातील मुख्य रस्त्यावरून अशा मेंढराचे कळपाचे फेरी काढली जाते.मागील अनेक पिढ्यांपासून तालुक्यात ही परंपरा सुरू आहे.
आम्ही गावातील काही धनगर व अन्य समाजातील कुटुंबांनी ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. दिपावली पाडव्याला हा मेंढरांचा सण म्हणून आम्ही साजरा करतो.
मेंढर,पालक शेतकरी
जत तालुक्यातील डफळापूर येथे मेंढरे पळविण्यासाठी नेहत असताना मेंढरपालक शेतकरी