जत,प्रतिनिधी : तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पासाहेब सिध्दू माळी व न्यू इंग्लिश स्कूल कोसारीचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण सांवत यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
अधिक माहिती अशी की,आप्पासाहेब माळी हे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य आहेत.प्रभाग 4 मधून त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे.सदर निवडणूकीसाठी त्यांनी हिंदू-माळी असल्याचे जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे.कुंभारी येथील ग्रामस्थ काकासाहेब शिंदे यांनी माळी यांच्या विरोधात जत पोलीसात फिर्याद दिली आहे.शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आप्पासाहेब माळी यांच्या शाळा सोडल्याच्या दाखलावर हिंदू-लिंगायत अशी नोंद आहे.मात्र न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्यध्यापक सुरेश सांवत याच्याशी संगनमत करून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-लिंगायत ऐवजी हिंदू-माळी अशी नोंद केली आहे. माळी व सांवत यांनी संगनमत करून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अधिक तपास गजानन कांबळे आहे.