जत,प्रतिनिधी : तालुक्यातील अल्प पावसाने शेतकरी सततचे अवर्षण व दुष्काळ मेटाकुटीस आला आहे.शेतकरी टिकवण्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात येत आहेत.ओढा पात्रातील हे बंधारे दुष्काळ हटविण्याच महत्वाची भुमिका बजावतील असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी केले.आमदार जगताप यांनी जत तालुक्यातील सात गावातील मंजूर जलयुक्त योजनेतील कोल्हापूर पद्धतीच्या सिमेंट बंधाऱ्याच्या भूमीपूजनाच्या उद्घाटन केले.त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये जत जवळील धायगुडे वस्ती,काशिलिंगवाडी,प्रतापूर, रामपूर,आबाचीवाडी,बेळुंखी,शेळके
आ.जगताप म्हणाले,सततच्या दुष्काळाचा सामना करावयाचा असेल तर पावसाचा थेंब ना थेंब अडविने गरजेचे आहे.त्यादृष्टीने सरकारकडून तालुक्यातील जलसंधारण,कामाबरोबर बंधाऱे बांधणीसाठी निधी उपलब्ध झाला आहे.या बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाचे पाठी साठून जलसाठे निर्माण झाल्यास दुष्काळाचा सामना करता येईल.हेच पाणी अडवून त्याचा वापर मात्र काटकसरीने करायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.यावेळी पंचायत समिती सभापती सुशीला तावशी,पंचायत समिती उपसभापती शिवाजी शिंदे , माजी सभापती प्रकाश जमदाडे,जि. प.सदस्या स्नेहलता जाधव, प्रभाकर जाधव, लक्ष्मण बोराडे, माणिक वाघमोडे,मारुती पवार,उपसरपंच दत्तात्रय नरळे,महावीर नरळे, इकबाल पठाण, प्रवीण वाघमोडे, तम्मा सगरे, राजू यादव, अजिंक्य सावंत, प्रकाश मोटे, अभियंता भिमाशंकर तेली, शेतकरी व कार्यकर्ते तसेच पाटबंधारे विभागाचे सहय्यक अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
जत तालुक्यातील बंधारे कामाचे भुमिपुजन करताना आ.विलासराव जगताप व मान्यवर