आंवढीत चिकनगुनिया, डेंग्यूचे थैमान

0
3

आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथे डेंग्यू,चिकनगुनिया साथीने थैमान घातले आहे.गावातील सुमारे 100 रुग्ण तापसदृष्य आजाराचे आहेत.त्यात चिकनगुनिया व डेंग्यू झालेले हरिदास कोडग,गणेश,कोडग,पंकड कोडग,वंसत शिंदे, धान्नवा काटे,आरोही होवाळे,संकेत तोरणे आदी रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गावात शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तपासणी केली.ग्रामपंचायतीनेही औषधे फवारली आहेत.तरीही साथीचे आजार वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. येथील उपकेंद्रात कायमस्वरूपी कर्मचारी नेमावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here