माडग्याळ,वार्ताहर:उटगी (ता.जत)येथील जि.प. कन्नड शाळेतील एका प्रोजेक्टवर गायब झाला आहे.तो एका शिक्षकांनेच गायब केल्याचा आरोप होत आहे.त्यांचा त्वरीत शोध घेऊन संबधित शिक्षकांवर कारवाई करावी.प्रोजेक्टवरचा त्वरीत तपास न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा उटगी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय माळकोटगी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनद्वारे दिला आहे.
अधिक माहिती अशी की,उटगी येथे जि.प.कन्नड शाळा गावात आहे.शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यतचे वर्ग आहेत.येथे सहा महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेकडून कन्नड शाळेसाठी प्रोजेक्टर मिळाला होता.मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे व मुलांची गुणवत्ता वाढावी म्हणून हा प्रोजेक्टर देण्यात आला होता.मात्र चालू स्थितीतील प्रोजेक्टर शाळेतून गायब झाला आहे.शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रोजेक्टर विषयी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे प्रोजेक्टर कोणी गायब होण्यात काहीतरी काळेबेरे आहे.त्याचा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी.अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य संजय माळकोटगी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनद्वारे दिले आहे.