जतमध्ये ऐतिहासिक दसरा उत्साहात

0
1

जत,प्रतिनिधी: विजयादशमीच्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जत शहरात पारपारिंक व ऐतिहासिक महत्व असणारा दसरा उत्साहात संपन्न झाला. येथील थोरल्या वेशीतील मारूती मंदिरासमोरील चौकात श्रीमंत शारदुलराजे डफळे यांच्या हस्ते शमीपुजन व शस्त्रपुजन करून दसऱ्यांचे शिलांगणाचे सोने लुटून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नवरात्रौत्सवातील स्ञी शक्तीच्या जागरांनतर दसरा साजरा केला जातो.जतच्या दसऱ्याचे पारंपरिक महत्व आहे.यावेळी जतचे पोलीस पाटील मदन पाटील, त्यांचे बंधू प्रा. चंद्रसेन माने पाटील, मोहन मानेपाटील तसेच गणपतराव कोडग,लायन्स क्लब जतचे अध्यक्ष दिनकर पतंगे, श्रीकृष्ण पाटील, मोहन चव्हाण, प्रा.शिवाजीराव चव्हाण, प्रा. कुमार इंगळे, सुधिर चव्हाण,सुरेश डफळे, अनिल शिंदे, विश्वनाथ सावंत, डाॅ. महेश भोसले, डाॅ.विजयकुमार पाटील, डाॅ. देवानंद वाघ,अॅड. मानसिंग जाधव, अॅड. श्रीपाद अष्टेकर, गुरूनाथ बिज्जरगी,अरूण शिंदे,धर्मराज माने,पापा सनदी आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान डफळापूर,शेगाव,येळवी,संख,उमदी,माडग्याळ, उमराणी, बिंळूर, सह तालुक्यातील सर्वच गावात दसऱ्यांचे पारंपरिक पध्दतीने शिमोलगणांचे सोने लुटण्यात आले.

जत येथे दसऱ्यानिमित्त पुजा करताना जतचे राजे श्रींमत शारदुलराजे डफळे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here