चालक सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष प्रविण पाथरूट

0
7

जत,प्रतिनिधी: जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच़्या जत तालुका अध्यक्षपदी प्रविण पाथरुट यांची निवड झाली.या संस्थेचा मेळावा नुकताच संपन्न झाला. त्यात कार्यकारी निवडण्यात आली.वाहन वाहतूक चालकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. अनेकवेळा अपघाताच्या घटनेत चुक नसताना स्थानिकाचा मार खावा लागतो.पोलिसाकडून अडवणूक केली जाते.वाटेत बंद पडलेल्या वाहनाना मदत करणे आदी प्रश्न सोडविण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. संस्थेचे संस्थापक संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचा ‘महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,गुजरात,कर्नाटक राज्यात विस्तार करण्यात आला आहे. भविष्यात ही संस्था देशभर काम करणार आहे.
जत येथील मेळाव्यात पश्चिम महा.सचिव मुकेश मोहिते, जिल्हाध्यक्ष महादेव शिंत्रे,कवटेमंहकाळ तालुकाध्यक्ष
नंदकुमार शिंदे,प्रशांत घोगरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here